विधानसभा निवडणूक : परभणी जिल्ह्यात १५० उमेदवारांचे अर्ज वैध
जिंतूर 41, परभणी 37, गंगाखेड 25, तर पाथरीमध्ये 47 उमेदवारांचे अर्ज वैध
परभणी : परभणी जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात प्राप्त अर्जांपैकी बुधवारी, ३० ऑक्टोबर रोजी झालेल्या छाननी प्रक्रियेत १५० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. जिंतूर विधानसभा मतदारसंघात ४१ उमेदवारांचे ५० नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले होते. छाननीमध्ये सर्वच अर्ज वैध ठरले आहेत. परभणीमध्ये ४६ उमेदवारांचे एकूण ५९ अर्ज प्राप्त झाले होते. ३७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. गंगाखेडमध्ये २९ उमेदवारांनी ३८ अर्ज दाखल केले होते. त्यापैकी २५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले, तर पाथरीत ५३ उमेदवारांनी ७७ अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ४७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. ही माहिती त्या-त्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिंतूर विधानसभा : 41 उमेदवारांचे अर्ज वैध
जिंतूर विधानसभा मतदारसंघाकरीता 41 उमेदवारांनी 50 अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 41 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले.
अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची नावेपुढील प्रमाणे आहेत. अनिल बन्सी चव्हाण (बहुजन समाज पार्टी), बोर्डीकर मेघना दिपक साकोरे (भाजप), भांबळे विजय माणिकराव (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार), कृष्णा त्रिंबकराव पवार (ऑल इंडिया हिंदुस्तान काँग्रेस पार्टी), दिनकर धारोजी गायकवाड (राईट टू रिकॉल पार्टी), नागरे सुरेश कुंडलीकराव (वंचित बहुजन आघाडी), डॉ. प्रभाकर बुधवंत (राष्ट्रीय समाज पक्ष), रमेश भिमराव राठोड (जय सेवालाल बहुजन विकास पार्टी), शेख सलीम शेख इब्राहीम (ऑल इंडिया मजलीस ए इन्कलाब ए मिलत), सुभाष किसन वाव्हळे (बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी), अच्युत लिंबाजी कदम (अपक्ष), अतुल निवृत्ती अंभुरे (अपक्ष), अनिल सयाजी अंभुरे (अपक्ष), अमोल लक्ष्मण डंबाळे (अपक्ष), अमृता सुरेशराव नागरे (अपक्ष), अंकुश सिताराम राठोड (अपक्ष), कदम मुंजाजी साहेबराव (अपक्ष), काजळे बाळासाहेब उर्फ प्रदिप महादेव (अपक्ष), खंडेराव किसनराव आघाव (अपक्ष), गणेश जगन्नाथ काजळे पाटील (अपक्ष), ढोले विष्णु दगडु (अपक्ष), पांडुरंग भास्करराव कदम (अपक्ष), डॉ. पुष्कराज प्रकाशराव देशमुख (अपक्ष), प्रसाद ज्ञानेश्वर काष्टे (अपक्ष), प्रेक्षा विजय भांबळे (अपक्ष), बालाजी माधवराव शिंदे (अपक्ष), भिसे राजेश भगवानराव (अपक्ष), राजीव किसनराव पंचागे (अपक्ष), विजय अण्णासाहेब ठोंबरे (अपक्ष), विजय माणिकराव चव्हाण (अपक्ष), विनोद दत्तात्रय भवाळे (अपक्ष), शरद सुदाम चव्हाण (अपक्ष), समीरराव गणेशराव दुधगावकर (अपक्ष), सय्यद रियाज गफुर सय्यद (अपक्ष), सरकटे अमोल भिमराव (अपक्ष), सुखदेव उध्दव भांबळे (अपक्ष), सुखदेव गोकुळ सोळुंके (अपक्ष), स्वाती बालासाहेब नखाते (अपक्ष), ज्ञानेदव नारायण दाभाडे (अपक्ष), ज्ञानेश्वर देवीदास राठोड (अपक्ष), ज्ञानेश्वर नुरा राठोड (अपक्ष).
परभणी विधानसभा : 37 उमेदवारांचे अर्ज वैध
परभणी विधानसभा मतदारसंघाकरीता 46 उमेदवारांनी 59 अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 37 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची नावेपुढील प्रमाणे आहेत. अशोक किशनराव खरात (बहुजन समाज पार्टी), आनंद शेषराव भरोसे (शिवसेना), डॉ. राहूल वेदप्रकाश पाटील (शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे), श्रीनिवास सुरेशचंद्र लाहोटी (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), ॲड. इम्तीयाज खान आजम खान (ऑल इंडिया मजलीस ए इतेहादूल मुस्लिमिन), डॉ. गोवर्धन भिवाजी खंडागळे (बहुजन भारत पार्टी), चकोर महामुनी सावित्री (राष्ट्रीय समाज पक्ष), विजय आदिनाथराव वरवंटे (बुलंद भारत पार्टी), शेख सलीम शेख इब्राहिम (ऑल इंडिया मजलिस-ए-इन्किलाब-ए-मिल्लत), अतिश बापूराव गरड (अपक्ष), अनिता रवींद्र सोनकांबळे (अपक्ष), ॲड. अफजल बेग साहाब (अपक्ष), अली खान मोईन खान (अपक्ष), किशोर सखाराम रनेर (अपक्ष), गजानन विश्वनाथ जोगदंड (अपक्ष), गोविंदभैया रामराव देशमुख पेडगावकर (अपक्ष), छत्रगुण आवचार पाटील नेते (अपक्ष), त्रिंबक देविदास पवार (अपक्ष), दिपक बलराम शिंदे (अपक्ष), देशमुख रमेश सदाशिव (अपक्ष), नासेर शरीफ शेख (अपक्ष), अ.पाशा अ. गफ्फार खुरेशी (अपक्ष), फारुख खान रऊफ खान (अपक्ष), बनसोडे सुरेश लक्ष्मणराव (अपक्ष), बालाजी नामदेवराव मोहिते (अपक्ष), महेमूद खान साहब (अपक्ष), मिर्झा जाकेर बेग (अपक्ष), मोहम्मद गौस झैन (अपक्ष), रवींद्र गोविंदराव सोनकांबळे (अपक्ष), विजय आंबादासराव वरपुडकर (अपक्ष), विनोद ज्ञानेश्वरराव रसाळ (अपक्ष), शेख रफीक अहमद (अपक्ष), सय्यद अतीक उर रहमान सय्यद अमीर (अपक्ष), सय्यद नौमान हुस्सैनी कौसर (अपक्ष), सय्यद फारुख अली उर्फ बाबा (अपक्ष), सूर्यकांत रोहिदास मोगल (अपक्ष), डॉ. संप्रिया राहुल पाटील (अपक्ष).
गंगाखेड विधानसभा : 25 उमेदवारांचे अर्ज वैध
गंगाखेड विधानसभा मतदारसंघाकरीता 29 उमेदवारांनी 38 अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 25 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले तर 4 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले.
अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची नावेपुढील प्रमाणे आहेत. कदम विशाल विजयकुमार (शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे), देशमुख रुपेश मनोहरराव (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), मदनजी रेनगडे पाटील (न्यु राष्ट्रीय समाज पार्टी), माधव सोपानराव शिंदे (राष्ट्रीय मराठा पार्टी), रत्नाकर माणिकराव गुट्टे (राष्ट्रीय समाज पक्ष), विठ्ठल जीवनाजी रबदडे (जनहित लोकशाही पार्टी), सिताराम घनदाट (मामा) (वंचित बहुजन आघाडी), अलका विठठल साखरे (अपक्ष), कदम संजय साहेबरराव (अपक्ष), कदम स्मिता संजय (अपक्ष), जलील गुलाब पटेल (अपक्ष), जोगदंड मुंजाजी नागोराव (अपक्ष), नामदेव रामचंद्र गायकवाड (अपक्ष), प्रविण गोविंदराव शिंदे (अपक्ष), बालासाहेब हरिभाऊ निरस (अपक्ष), भगवान ज्ञानोबा सानप (अपक्ष), भोसले विष्णुदास शिवाजी (अपक्ष), लक्ष्मण शंकरराव शिंदे (अपक्ष), विठ्ठल सोपान निरस (अपक्ष), विशाल बबनराव कदम (अपक्ष), विशाल बालाजीराव कदम (अपक्ष), शिरीन बेगम मोहम्मद शफिक (अपक्ष), शेख हबीब शेख रसूल (अपक्ष), ॲड. संजीव देवराव प्रधान (अपक्ष), श्रीकांत दिगांबर भोसले (अपक्ष). अर्ज अवैध ठरलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. शिवराज प्रभाकर पैठणे (बहुजन समाज पार्टी), संग्राम केशवराव रेंगे (अपक्ष), विशाल बंडू कदम (अपक्ष), राजभोज राजकुमार बाबुराव (अपक्ष).
पाथरी विधानसभा : 47 उमेदवारांचे अर्ज वैध
पाथरी विधानसभा मतदारसंघाकरीता 53 उमेदवारांनी 77 अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 47 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. तर 6 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची नावेपुढील प्रमाणे आहेत. राजेश उत्तमराव विटेकर (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), वरपुडकर सुरेश अंबादासराव (इंडियन नॅशनल काँग्रेस), गणेशनाथ आदीनाथ जाधव (स्वराज्य शक्ति सेना), त्रिंबक देविदास पवार (ऑल इंडिया हिन्दुस्थान काँग्रेस पार्टी), मो. फयाजोद्दीन अन्सारी मो. नवाजोद्दीन अन्सारी (ऑल इंडिया मजलिस-ए-इन्कलाब-ए-मिल्लते), सईद खान शेरगुल खान (राष्ट्रीय समाज पक्ष), सचिन सुरेश निसर्गंध (बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी), सुरेश किशनराव फड (वंचित बहुजन आघाडी), अतिश बापुराव गरड (अपक्ष), अब्दुला खान लतीफ खान दुर्रानी (अपक्ष), अभिजित अनंतराव कदम (अपक्ष), अर्जुन रामराव साबळे (अपक्ष), अर्जुन ज्ञानोबा भिसे (अपक्ष), अरुण सितारामजी कोल्हे (अपक्ष), अलीशेर महेबुब पाशा खुरेशी (अपेक्ष), किरण राधाकिशन शिंदे (अपक्ष), किशोरकुमार प्रकाश शिंदे (अपक्ष), गयाबाई माधवराव फड (अपक्ष), गोविंद मदन घांडगे (अपक्ष), चंद्रसिंग एकनाथ नाईक (अपक्ष), जगदिश बालासाहेब शिंदे (अपक्ष), टेंगसे दादासाहेब रामराव (अपक्ष), तुकाराम धोंडीबा रूमाले (अपक्ष), नितिन रामराव लोहट (अपक्ष), प्रल्हाद दत्ताराव पाटील (अपक्ष), बापू रावसाहेब कोल्हे (अपक्ष), बालासाहेब तुकाराम पौळ (अपक्ष), भास्कर रामकिशन बेंद्रे (अपक्ष), माधवराव तुकाराम फड (अपक्ष), मीरा कल्याणराव रेंगे (अपक्ष), मोईज अन्सारी अब्दुल खादर (अपक्ष), मोहन जनार्धन कुलकर्णी (अपक्ष), मंचकराव सागरराव बचाटे (अपक्ष), मुंजा ज्ञानदेव कोल्हे (अपक्ष), रविंद्र विठ्ठलराव देशमुख (अपक्ष), राजेश बालासाहेब पाटील (अपक्ष), राम उर्फ रामराव अच्युतराव शिंदे (अपक्ष), रंगनाथ मोहनराव सोळंके (अपक्ष), शिवाजी देवजी कांबळे (अपक्ष), शेख मुश्ताक रज्जाक (अपक्ष), समाधान आश्रोबा साळवे (अपक्ष), समीरराव गणेशराव दुधगावकर (अपक्ष), सर्जेराव बाजीराव फड (अपक्ष), संजय किशनराव कच्छवे (अपक्ष), संतोष मुंजाभाऊ गवळी (अपक्ष), संदिप सोपान दातरे (अपक्ष), ज्ञानेश्वर अच्युतराव काळे (अपक्ष).