विधानसभा निवडणूक : निरीक्षक के.हरिथा यांच्याकडून मतदान केंद्रांची तपासणी

विधानसभा निवडणूक : निरीक्षक के.हरिथा यांच्याकडून मतदान केंद्रांची तपासणी

जिंतूर : जिंतूर तालुक्यातील बोरी येथील मतदान केंद्राची निवडणूक निरीक्षक श्रीमती के.हरिथा यांनी पाहणी करून तपासणी केली. बोरी येथील जिल्हा परिषद शाळेमधील संकुलामध्ये 12, अन्य दोन अशी एकूण 14 मतदान केंद्र आहेत. जिंतूर येथील आयटीआय मधील स्ट्रॉंग रूम , ट्रेनिंग हॉल व मतदानासाठी आवश्यक असलेल्या साहित्याची पाहणी केल्यानंतर, जिंतूर तहसील कार्यालयात के.हरीता यांनी आढावा बैठक घेतली. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी, तहसीलदार राजेश सरवदे, डॉ.शिवाजी मगर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते
बोरीमध्ये सर्व मतदान केंद्राची तपासणी केल्यानंतर निवडणूक निरीक्षक व त्यांची टीम जिंतूर मधील आयटीआय कॉलेजला भेट देऊन तेथील स्ट्रॉंग रूम ,ट्रेनिंग हॉल व मतदानासाठी आवश्यक असलेल्या इतर सर्व साहित्याची पाहणी केल्यानंतर त्यांनी तहसील कार्यालय, जिंतूर येथे जाऊन निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी,तहसीलदार राजेश सरवदे, तहसीलदार डॉ..शिवाजी मगर यांच्या समवेत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आढावा घेतला.

येणारी निवडणूक अतिशय शांततापूर्ण व निवडणूक आयोगाने घालून दिलेले निर्देशानुसार पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज राहील या करिता सर्व मतदान केंद्र सज्ज असून प्रशासनही तयार आहे. सर्व नागरिकांनी होणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदान करून निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी स्वतःहून पुढे येऊन प्रशासनास सहकार्य करावे.असे आवाहन यावेळी प्रशासनाच्या वतीने तहसीलदार राजेश सरवदे यांनी केले. या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी बेनिवाल, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी युवराज पोळ, नायब तहसीलदार सुग्रीव मुंढे, प्रशांत राखे, पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार, मंडळ अधिकारी मोहसीन पठाण, तलाठी  हनुमान बोरकर तसेच सर्व बीएलओ व इतर अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!