विधवा आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांची दिवाळी आनंददायी
शेक हॅण्डच्या कार्यक्रमात ५१ कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
परभणी : शेक हॅण्ड फाउंडेशन आयोजित आधार निराधारांना अंतर्गत दिवाळी कार्यक्रमात शिवाजी इंजिनिअरिंग कॉलेज परभणी येथे ५१ निराधार गरजू आत्महत्याग्रस्त विधवा महिलांना साडी,फराळ,किराणा व दिव्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी नांदेड येथील कवयित्री सारिका उबाळे या उपस्थित होत्या. विधवा महिलांनी समर्थपणे परिस्थितीचा सामना करून आत्मनिर्भर बनावे असे मत त्यांनी कार्यक्रमात व्यक्त केले.तर प्रतिभा शेळके यांनी स्वतः परिस्थितीतून बाहेर पडून कशा प्रकारे पतीच्या निधनानंतर देखील वस्तीगृह चालू ठेवून समर्थपणे चालवले या विषयी माहिती दिली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह. भ.प.गोविंद महाराज पौंढे हे उपस्थित होते तर मंचावर सिनेट सदस्य नारायण चौधरी हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाम गाडेकर तर आभार संतोष चव्हाण यांनी मानले.सूत्रसंचालन ज्योती चौंडे यांनी केले.ग्रामीण भागातून विविध गावातून महिला या साठी उपस्थित होत्या.त्यात बाभुळगाव,उमरी,रायपूर,पिंपळा,लोन,थोरावा,पडेगाव,आडगाव, अंजनवाडा,खरबा,कुप्टा,परभणी, सोन्ना,पांगरी आदी गावच्या निराधार आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला उपस्थित होत्या.दिलेल्या किराणात साखर,चणाडाळ,पत्ती,पोहे,तेल,मोतीसाबन,घडी पावडर, व्हील साबण,शेंगदाणे,मैदा,रवा,आगरबत्ती.इत्यादी 16 वस्तूंचा समावेश होता.तर फराळ मध्ये मोतीचुर लाडू व चिवडा, साडी व दिवे अशी पूर्ण वस्तूची किट देण्यात आली. किटसाठी शेक हॅण्डच्या 53 जणांनी मदतीचा हात पुढे केला. कार्यक्रमासाठी शेक हॅण्डच्या रोहिदास कदम,राजू पांचाळ,नितीन तांदळे,मुंजाभाऊ शिळवणे,रवी लोहट, भरत भालेराव,कृष्णा पांचाळ,भास्कर वाघ,अजय महाजन,अर्चना पावडे,सुलक्षणा देशमुख,सीमा चौधरी,पांडुरंग चव्हाण,शरद लोहट आदींनी परिश्रम घेतले