पाडव्यानिमित्त ‘दिवाळी पहाट’ची संगीत मेजवानी

पाडव्यानिमित्त ‘दिवाळी पहाट’ची संगीत मेजवानी

सेलूतील अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेचा उपक्रम, उद्या सकाळी श्री केशवराज बाबासाहेब मंदीरात कार्यक्रम

पाडव्यानिमित्त 'दिवाळी पहाट'ची संगीत मेजवानी

सेलू : अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्था, सेलू आयोजित स्वरांगण प्रस्तुत दीपावली पाडव्याच्या खास मुहूर्तावर सेलूच्या सांस्कृतिक परंपरेला साजेसा  ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम शनिवारी २ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ६.०० वाजता श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदीर सभागृहात आयोजत करण्यात आला आहे. रसिक श्रोत्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक तथा जिपचे माजी सभापती अशोक काकडे यांनी केले आहे.
कार्यक्रमात सच्चिदानंद डाखोरे, पूजा तोडकर, मधुप्रिया कांबळे (छत्रपती संभाजीनगर) आणि लक्ष्मीकांत दिग्रसकर विविध भाव भक्तीगीते सादर करणार आहेत. गिरीश दीक्षित-ढोलक, कार्तिक हिंगणे-तबला, श्रीनिवास लंकावाड-बासरी (नांदेड), नईम शेख-कीबोर्ड (नांदेड) प्रणव जोग – गिटार, संदीप पुंडगे – ऑक्टोपॅड (नांदेड) यांची साथसंगत असेल,  निवेदन- महेश अचिंतलवार (छत्रपती संभाजीनगर)  करणार आहेत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!