शमशोद्दीन शेख यांचा सेलूमध्ये सेवागौरव
एलआयसीमध्ये बजावली तब्बल ३४ वर्षांची सेवा
सेलू/ परभणी : सेलू येथील भारतीय आयुर्विमा महामंडळ शाखेतील उच्च श्रेणी सहाय्यक तथा विमा कामगार संघटनेचे नांदेड विभागीय अध्यक्ष शमशोद्दीन शेख यांचा सेवा निवृत्तीबद्दल गुरूवारी, ३१ ऑक्टोबर रोजी विविध मान्यवरांच्या वतीने सेवागौरव करण्यात आला.
शेख यांनी एलआयसीमध्ये ३४ वर्ष ८ महिने प्रदीर्घ सेवा दिली आहे. ३१ ऑक्टोबर रोजी ते सेवानिवृत्त झाले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात शेख यांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी शाखा प्रबंधक भाऊसाहेब ठोंबरे होते. याप्रसंगी योगेश जयभाये, नागेश पुराणिक उपेंद्र बेल्लुरकर, भास्कर हिप्परगे, गणेश शिंदे, शिवाजी अघाव, मन्मथ देवढे, संपत कपाळे, प्रकाश रोडगे, संपत पंडित, डॉ अनिल शेळके, पांडुरंग चिंचाणे, महेबूब शेख यांनी मनोगतातून शेख यांचा कार्य गौरव केला. शेख यांची दीर्घ सेवा संस्मरणीय आहे. मितभाषी स्वभाव, कार्याप्रती निष्ठा, सामाजिक बांधिलकी, धडपड, सचोटी, स्नेहशीलता, विनम्रता, सामाजिक बांधिलकीची जपणूक करीत शेख यांनी एलआयसीतील सेवा करतांना माणूसपण जपण्याचा निरंतर प्रयत्न केला आहे, अशा भावना मान्यवरांनी या वेळी व्यक्त केल्या.
शेख यांनी कृतज्ञता व्यक्त करीत आभार मानले. प्रास्ताविक नागेश पुराणिक यांनी केले. सूत्रसंचालन व आभार मन्मथ देवढे यांनी मानले. कार्यक्रमाला प्रभाकर भांडवले, सुभाष राठोड, भारत डख, समीर थोरात, राजेश भालेराव, कृष्णा बोराडे, अमर पाटील, खोबराजी वालवटे, नवनाथ कुकडे, नामदेव मुंढे, राजकुमार नाईकवाडे, संजय मुंढे, शेख मोहसीन, दिलीप डासाळकर, भगवानराव सराफ, सुरेंद्र सराफ, संघशिल भुकत्तर,बंडु कटारे, साहेबराव राठोड, काष्टे, विनोद भोगांवकर, भगवानराव अकात, बालासाहेब पिंपळे, मुंजा राऊत, गणेश कडतन, दामोधर काकडे, विष्णू मुळे, बळीराम पाते, देवदत्त वाघमारे,खेडकर, कृष्णा गोगें, बाबासाहेब कदम, कैलास गजमल, संजय मणियार, भारत डख, वसंत डख, माणिक पडुळे, बोराडे, पाचलेगांवकर, सीताफळे, दत्ता सरकटे, बबन झोल, संदिप जाधव, नितीन भिसे, अमिर शेख, आदींसह अधिकारी, कर्मचारी, नागरिकांची मोठी उपस्थिती होती.