इंद्रायणी किड्स किंग्डमचे उद्घाटन 

इंद्रायणी किड्स किंग्डमचे उद्घाटन 

मांडाखळीत दर्जेदार पूर्व प्राथमिक शिक्षणाची सोय 

परभणी : ज्ञानसाधना प्रतिष्ठान परभणी संचालित इंद्रायणी मांडाखळी येथील किड्स किंग्डमचे उद्घाटन सेवानिवृत्त उच्च श्रेणी मुख्याध्यापक शिवसांभ सोनटक्के व गंगाबाई सोनटक्के यांच्या व जनार्दन महाराज खडकवाडीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. याप्रसंगी संस्था अध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के, सचिव शितल सोनटक्के, रवी देशमुख, सरपंच नागेश शिराळ पाटील, उपसरपंच मोहसीन शेख, अशोक आप्पा धुळे, पोलीस पाटील गणेशराव सामाले आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या प्रास्ताविकपर मनोगतात सचिव शितल सोनटक्के यांनी सांगितले की, आमचे मूळगाव असलेल्या मांडाखळी येथील मुलांनासुद्धा परभणी शहरातील मुलांप्रमाणे सर्व भौतिक सुविधा व डिजिटल क्लासरूमसह अद्ययावत व दर्जेदार शिक्षण मिळावे, हा उद्देश ठेवून इंद्रायणी किड्स किंग्डम या पूर्व प्राथमिक शाळेची जून २०२४ पासून सुरुवात केली आहे. केवळ सहा महिन्यात सदर शाळा स्वतंत्र नूतन वास्तूमध्ये प्रवेश करते आहे. याचा आम्हास खूप आनंद वाटतो. या वास्तूच्या निर्माण कामासाठी विशेष सहकार्य लाभलेले संपत गवते, अर्जुन कने, त्र्यंबक राऊत यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. विभाग प्रमुख म्हणून अनुराधा राजुरे यांची, तर सह विभागप्रमुख प्रमुख म्हणून रेणुका देव यांची नियुक्ती करण्यात आली. सूत्रसंचालन जोशी यांनी केले, तर आभार राजुरे यांनी मानले. संस्थेचे समन्वयक, विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मांडाखळी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!