विधानसभा निवडणूक : शरद पवार यांची सेलूमध्ये शुक्रवारी जाहीर सभा
भांबळे यांच्या प्रचारार्थ सभा; नूतन विद्यालयाच्या मैदानावर जय्यत तयारी सुरू
सेलू : जिंतूर-सेलू विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार विजय भांबळे यांच्या प्रचारार्थ ८ नोव्हेंबर, शुक्रवार रोजी दुपारी ४ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरदचंद्र पवार यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी सप च्या मीडिया विभागाकडून या बाबत कळविण्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर रविवारी, प्रमोदराव भांबळे यांनी नूतन विद्यालयाच्या मागील मैदानाची पाहणी केली.
या वेळी माजी जिप सभापती माजी अशोक काकडे, जिप उपाध्यक्ष राजेंद्र लहाने, विनायकराव पावडे, अप्पासाहेब डख, माऊली राऊत, रंजीत गजमल, पप्पू गाडेकर, शिवराम कदम, रघुनाथ बागल, संदेश बोराडे, सचिन शिंदे, अक्षय कदम, परवेज सौदागर, मदन पवार, भागवत बालटकर, तोफिक भाई, दत्तराव गायके, संतोष गायके आदी उपस्थित होते.