अभूतपूर्व उत्साह, लेझीम पथकाने वेधले लक्ष
सेलू : महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त बसवेश्वरांच्या अर्धाकृती पुतळ्याची, रविवारी (आठ मे) सायंकाळी सेलू (जि.परभणी) शहरात ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
वीरशैव लिंगायत समाज बांधवांनी याचे आयोजन केले होते. श्री शंकरलिंग मंदिर परिसरात, कैलास व पशुपती स्वामी शिवहर शिवणकर यांचे हस्ते पूजन करण्यात आले. मारवाडी गल्ली, संत श्री गोविंदबाबा चौक, जवाहर रस्ता, क्रांती चौक, लोकमान्य टिळक पुतळा, गणपती गल्ली, नावाडे गल्ली, सूरज मोहल्ला या मार्गाने मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. लेझीम पथक आकर्षण ठरले. स्फूर्ती गीतांवर महिला व पुरुषांनी ठेका धरला. चार तास चाललेल्या मिरवणुकीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत झाले.
माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, विनोद तरटे, बाजार समिती प्रशासक मंडळातील सदस्य साईराज बोराडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रघुनाथ बागल, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग शेळके, अर्जुन बोरुळ, प्रवीण क्षीरसागर यांनी बसवेश्वरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांची उपस्थिती होती. महाआरती, महाप्रसादाने सांगता झाली.

यशस्वीतेसाठी राजेंद्रअप्पा महाजन, अशोकअप्पा वाडकर, विनोद तरटे,ॲड.गिरीश साडेगावकर, गणेशअप्पा नाईकवाडे, महादेव आगजाळ, रेवणअप्पा साळेगावकर, ॲड.अनिल तोडकर, शुभम महाराज, ॲड. श्याम राऊत, विश्वनाथ होगे, प्रकाश साखरे, पवन मिटकरी, बाळू झमकडे, पवन कामठे, मिलिंद झमकडे, ऋषीकेश झमकडे, उत्तरेश्वर साडेगावकर, सोनू राऊत, सागर अगजाळ, मिटकरी शुभम नवघरे, ओंकार महाजन, मल्लिकार्जुन भोगांवकर आदींसह वीरशैव लिंगायत समाज बांधवांनी परिश्रम घेतले.