मतदान कर्मचाऱ्यांच्या १ हजार ८०३ टीमचे प्रशिक्षण

मतदान कर्मचाऱ्यांच्या १ हजार ८०३ टीमचे प्रशिक्षण

परभणी : जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात निवडणुक कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीची संगणकीकृत सरमिसळ प्रक्रिया ४ नोव्हेंबर रोजी निवडणूक निरिक्षक (सामान्य) के. हरीता आणि संचिता बिष्णोई तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत पार पडली. जिल्ह्यात एकूण १  हजार ८०३ टीम तयार करण्यात आल्या असून त्यांचे दुसरे प्रशिक्षण नेमून दिलेल्या मतदारसंघात ९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती देण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील संगणकीय सरमिसळ करतांना महिला आणि दिव्यांग कर्मचारी यांचा समावेश संगणकीय प्रणालीत न करता मॅन्युअली संबंधित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे स्तरावरून आवश्यकतेनुसार करण्यात येणार आहे. मतदान कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीचा तिसरा टप्पा १८ नोव्हेंबर रोजी निवडणूक निरिक्षक यांच्या उपस्थितीत पार पडणार असून या टप्प्यात तयार झालेल्या टीमच्या नियुक्तीचे मतदान केंद्र निश्चित होणार आहे. यासाठी कर्मचारी व्यवस्थापन कक्षाचे नोडल अधिकारी संदीप घोन्सीकर, जिल्हा आय.टी.नोडल अधिकारी सुनिल पोटेकर यांचे समवेत संगणक प्रणाली यशस्वीपणे अंमलबजावणीसाठी सदानंद जोशी, अमोल पाठक, सतीश भातलवंडे, दिपक इंगळे, सावनकुमार कुपटेकर तसेच सुरेश पुंड, शारदा कोके, प्रदिप मुनेश्वर यांनी परीश्रम घेतले आहे.

 

पूर्ण..

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!