विधानसभा निवडणूक : जिंतूर मतदारसंघात मतपेटी सिलिंगचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

विधानसभा निवडणूक : जिंतूर मतदारसंघात मतपेटी सिलिंगचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

परभणी : 95- जिंतूर विधानसभा मतदारा संघात सोमवारी, 11 नोव्हेंबर 2024 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी मतदारसंघातील कर्मचाऱ्याना निवडणुकीकरिता ज्या मतपेट्या पाठवणार आहेत. त्या मतपेट्या व्यवस्थित तपासणी करण्यासाठी, त्यांची सिलिंग करणे आवश्यक असते. या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून सिलिंगचे प्रशिक्षण दिले. या वेळी मास्टर ट्रेनरद्वारे प्रत्यक्ष व्हीव्हीपॅट, कंट्रोल युनिट व बॅलेट युनिट याविषयी सविस्तर माहिती देऊन त्याचेही व्यवस्थित ट्रेनिंग देण्यात आले. तसेच प्रशिक्षणाच्या शेवटी कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन चर्चा केली. सदर सिलिंग दिनांक 12 नोव्हेंबर 2024 रोजी पासून सुरुवात होणार असून एकूण 41 टेबल ची नियुक्ती केलेली आहे.
प्रत्येक टेबलवर 1 झोनल अधिकारी, 1 मास्टर ट्रेनर, 1 तलाठी व 1 महसूल सेवक याप्रमाणे 4 जणांची टीम असणार आहे. तसेच 95 जिंतूर मतदार संघात एकूण 438 मतदान केंद्रामधून 5% निवड झालेल्या 22 ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनच्या प्रत्येकी संचावर 1000 मॉक पोल घेण्यासाठी सुद्धा झोनल अधिकारी, मास्टर ट्रेनर, तलाठी व महसूल सेवक यांचे 22 टेबल नियुक्त करण्यात आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेश सरवदे, नायब तहसीलदार निवडणूक सुग्रीव मुंढे यांच्यासह झोनल अधिकारी, मास्टर ट्रेनर, तलाठी,मंडळ अधिकारी व इतर कर्मचारी उपस्थित होते.

विधानसभा निवडणूक : जिंतूर मतदारसंघात मतपेटी सिलिंगचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!