उद्धव ठाकरे यांची परभणीत आज सभा

उद्धव ठाकरे यांची परभणीत आज सभा

परभणी  : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची उमेदवार डॉ.राहुल पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी, ९ नोव्हेंबररोजी सायंकाळी सात वाजता परभणी येथील महात्मा फुले विद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा आहे.  दरम्यान, ठाकरे यांचा परभणी येथे दोन दिवस मुक्काम असणार आहे. शुक्रवारी त्यांचा मुक्काम छत्रपती संभाजीनगरात होता; पण विमानतळावरील तांत्रिक अडचणींमुळे त्यांना मुक्कामाचे शहर बदलावे लागले आहे. याबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा परतूर येथे होती. ही सभा झाल्यावर ते मुक्कामासाठी छत्रपती संभाजीनगरात येणार होते. मुक्काम करून ते शनिवारी सकाळी पुढील प्रचार दौऱ्यासाठी रवाना होणार होते. परतूर येथील सभेनंतर ठाकरे परभणीला मुक्कामाला जाणार आहेत. शनिवारी हिंगोली, कळमनुरी, गंगाखेड आणि परभणी येथे त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. जाहीर सभेनंतर त्यांचा मुक्काम परभणीतच असणार आहे. रविवारी सकाळी ते नांदेडला रवाना होणार असून, नांदेडहून ते मुंबईला जातील.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!