विधानसभा निवडणूक : जिंतूरमध्ये गीतगायनाव्दारे मतदान जनजागृती

विधानसभा निवडणूक : जिंतूरमध्ये गीतगायनाव्दारे मतदान जनजागृती

जिंतूर/ परभणी : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवा यासाठी जिंतूर विधानसभा मतदार संघातील शहरी व ग्रामीण भागात स्वीप पथकामार्फत विविध घोषणा, कविता तसेच जन हो करा तुम्ही मतदान सारख्या गीतगायनाद्वारे मतदार जनजागृती केली जात आहे. सोमवारी, ११ नोव्हेंबररोजी जोगवाडा, सोस, बामणी या ग्रामीण भागातील मतदानाची टक्केवारी कमी असलेल्या भागामध्ये स्वीप पथकाने जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले होते. निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी तथा  जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे, स्वीप नोडल अधिकारी गणेश शिंदे, निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी, सहायक अधिकारी राजेश सरवदे, डॉ.शिवाजी मगर, त्र्यंबक पोले, नायब तहसीलदार सुग्रीव मुंडे यांच्या नियोजनानुसार मतदार जनजागृती कार्यक्रम सुरू आहे. जिंतूरच्या शहरी भागातील मतदानाची टक्केवारी कमी असलेल्या भागामध्ये चुनाव पाठशाळा, चौका-चौकात लोकशाही गप्पा, पथनाट्य याद्वारे जनजागृती केली जात आहे. मयूर जोशी, राजेंद्र ढाकणे, मारुती घुगे, पांडुरंग भांबळे, दिनकर घुगे, प्रमोद दाभाडे, प्रभाकर नालंदे, भास्कर मुंढे, नितीन पेठे यांचा यात सहभाग आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!