श्रीसंत गोविंदबाबा शिक्षण प्रसारक मंडळ : अध्यक्षपदी रामनाना पाटील यांची बिनविरोध निवड
सेलू : सेलू येथील श्रीसंत गोविंदबाबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी उद्योजक तथा माजी जिप सदस्य रामनाना पाटील खराबे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. शनिवारी, ९ नोव्हेंबर रोजी मुंजाभाऊ भिसे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. या वेळी जेष्ठ संचालक जयप्रकाशजी बिहाणी, श्रीवल्लभजी लोया, प्राचार्य डॉ.ए.एम.डख, चंद्रप्रकाश सांगतानी, सुनील डख, बंडूनाना कदम, जीवनअपा तरवडगे, दिपकराव खराबे, प्रल्हादराव कान्हेकर, प्रफुल्लकुमार बिनायके. नंदकिशोरजी बहिवाल. चंद्रशेखर नावाडे, एकनाथराव पौळ यांची उपस्थिती होती. श्री.पाटील यांच्या निवडीचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.