केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा

जिंतूर येथील साई ग्राऊंडवर बुधवारी सभा

परभणी : जिंतूर, सेलू विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांची बुधवारी, १३ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता जिंतूर (जि.परभणी) येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या वेळी महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि मित्रपक्षातील आजी माजी लोकप्रतिनिधी, नेते, पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. जिंतूर येथील साई ग्राउंडवर आयोजित सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!