विविध निवडणूक कक्षांची जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केली पाहणी

विविध निवडणूक कक्षांची जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केली पाहणी

परभणी : परभणी विधानसभा मतदारसंघ निवडणूक अंतर्गत तहसिल कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या विविध कक्षांची जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी सोमवारी, ११ नोव्हेंबररोजी पाहणी केली. जिल्हाधिकारी यांनी साहित्य कक्ष, टपाली मतपत्रिका कक्ष, फॅसिफिकेशन सेंटर, सि-व्हिजील कक्ष व इतर निवडणूक कक्षांना भेट दिली व कामाकाजाचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले. श्री.गावडे यांनी निवडणूक साहित्य कक्षाची पाहणी करताना साहित्य वाटपाचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश दिले. सर्व साहित्य वेळेत संबंधित स्थळी पोहोचविण्याची दक्षता घेण्यास सांगितले. टपाल मतपत्रिका, आचारसंहिता कक्षाचीही त्यांनी पाहणी केली. त्यानंतर प्रसार माध्यम कक्षाला जिल्हाधिकारी यांनी भेट दिली. कक्षामध्ये सुरु असलेल्या जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीचे कामकाज, मुद्रित, इलेक्ट्रॉनिक व समाज माध्यमांच्या कामाकाजाचा त्यांनी आढावा घेतला व मार्गदर्शन केले. या वेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण, संतोषी देवकुळे, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे, नायब तहसिलदार सतीश रेड्डी आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!