मतदारांना वेळेत पोलिचिट वाटप करा; अन्यथा कारवाई

मतदारांना वेळेत पोलिचिट वाटप करा; अन्यथा कारवाई

जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची बीएलओ यांना सक्त ताकीद

परभणी : विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या हक्कापासून एकही मतदार वंचित राहू नये, यासाठी बीएलओ यांनी आपापल्या मतदान केंद्रांतर्गत मतदारांच्या घरोघरी जाऊन पोलचिट (ओटर स्लिप) वाटपाचे काम गांभार्याने आणि वेळेत पूर्ण करावे, अन्यथा कारवाई करण्यात येईल, अशी सक्त ताकीद जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी मंगळवारी, १२ नोव्हेबर रोजी जिंतूर येथे दिली आहे.

जिल्हाधिकारी श्री.गावडे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते यांनी मंगळवारी जिंतूर, सेलू, पाथरी, मानवत विधानसभा मतदार संघात भेटी देऊन विधानसभा निवडणूक विषयक प्रशासनाच्या सर्वंकष तयारीचा आढावा घेतला.सकाळी जिंतूर मतदारसंघात श्री गावडे यांनी भेट दिली. ईव्हीएम कमिशनींग, सीलिंग, मतमोजणी व्हॉल, स्ट्रॉंग रूम, सुविधा कक्ष, साहित्य कक्षाची पाहणी केली. पोलचिट वाटपाचा कामकाजी माहिती घेऊन महत्वाचे सूचना व निर्देश दिले. जिंतूर येथील मतदार केंद्राची पाहणी करून मतदारांना प्रत्यक्ष पोलचिट वाटप केले. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी, तहसीलदार राजेश सरवदे, डॉ.शिवाजी मगर, मुख्याधिकारी युवराज पौळ, नायब तहसीलदार प्रशांत राखे, सुग्रीव मुंढे, मंडळ अधिकारी मोहसीन पठाण आदींची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी श्री.गावडे यांनी दुपारी दोनच्या सुमारास सेलू येथील नूतन महाविद्यालय परिसरातील मतदान केंद्राची पाहणी केली. मतदान केंद्रावरील भौतिक सोयसुविधा उपलब्धतेबाबत  माहिती घेतली. एकाही मतदान केंद्रावर मतदारांना कोणत्याही परिस्थित उन्हात थांबावे लागू नये यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना श्री.गावडे यांनी या वेळी अधिकाऱ्यांना केल्या. प्राचार्य डॉ.उत्तम राठोड यांनी श्री.गावडे यांचे स्वागत केले. या वेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते, नायब तहसीलदार प्रशांत राखे, मुख्याधिकारी युवराज पौळ, तलाठी मुकुंद आष्टीकर मुस्तजाब खान, भगवान चव्हाण, ज्ञानेश्वर पारसेवार, ज्ञानेश्वर काकडे, ज्ञानेश्वर जाधव आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!