संजय साडेगावकर ‘वंचित’ मध्ये दाखल

संजय साडेगावकर ‘वंचित’ मध्ये दाखल

शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’, वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश, समर्थकांची मोठी उपस्थिती

सेलू/परभणी : २०१४ च्या जिंतूर विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर ३० हजार ३१० मते मिळविणारे, सेलू तालुक्यातील वालूर येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे परभणी जिल्हाप्रमुख संजय साडेगावकर यांनी ऐन विधानसभा निवडणुकीत जिल्हाप्रमुख पदाचा तडका फडकी राजीनामा दिला. आणि सोमवारी, ११ नोव्हेंबर रोजी रात्री वालूर येथे आयोजित कार्यक्रमात समर्थकांसह वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे जिंतूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सुरेश नागरे यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री.साडेगावकर यांनी रविवारी, १० नोव्हेंबर रोजी शिवसेना (उबाठा) खासदार संजय जाधव यांच्याकडे जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे‌. दरम्यान, साडेगावकर यांचा वंचित बहुजन आघाडीतील पक्ष प्रवेश, शिवसेना (उबाठा) तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार विजय भांबळे यांना मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!