उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मानवतमध्ये सभा
परभणी : पाथरी विधानसभा मतदारसंघांतील महायुतीचे उमेदवार तथा आमदार राजेश विटेकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवारी (१३ नोव्हेंबर) सकाळी अकरा वाजता मानवत येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. वालीबाचा मळा (राघवेंद्र इस्टेट) या ठिकाणी ही सभा होणार आहे. सभेच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महायुतीतील अन्य घटक पक्षांच्या नेतेमंडळींसह पदाधिकार्यांनी मानवत, पाथरी तालुक्यात मोठी वातावरण निर्मिती केली असून, जोरदार शक्तीप्रदर्शनाचे नियोजन केले आहे. सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.