गृहमंत्री अमित शहा यांची जिंतूरमध्ये सभा

गृहमंत्री अमित शहा यांची जिंतूरमध्ये सभा

वाहतुकीत मोठा बदल

परभणी : जिंतूर, सेलू विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा यांची बुधवारी, १३ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता जिंतूर (जि.परभणी) येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या वेळी महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि मित्रपक्षातील आजी माजी लोकप्रतिनिधी, नेते, पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. जिंतूर येथील साई ग्राउंडवर आयोजित सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, सभेद्वारे महायुतीच्या उमेदवार तथा आमदार बोर्डीकर, ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्यासह नेतेमंडळी व पदाधिकार्‍यांनी जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी केली आहे.

वाहतुकीत मोठा बदल

जिंतूर ते परभणी या महामार्गावर सभेचे स्थळ आहे. तसेच सभास्थळापासून हिंगोली, नांदेड, जालना तसेच छत्रपती संभाजीनगर या ठिकाणांकडे ये-जा करणारी वाहतूक मोठी आहे. सतत वर्दळीच्या असणार्‍या या रस्त्यावर या सभेच्या निमित्ताने वाहतुकीची कोंडी होवू नये म्हणून जिल्हा पोलिस दलाने अतिमहत्वाच्या व्यक्तीची सभा ओळखून या महामार्गावर बुधवारी सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वाहतुकीत मोठे बदल केले असून जिंतूरकडे येणारी जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. सभास्थळाच्या चोहोबाजूंनी वाहन पार्कींग व्यवस्थासुध्दा करण्यात आली आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!