जिंतूर,सेलूचा सर्वांगीण विकास करू

जिंतूर,सेलूचा सर्वांगीण विकास करू

भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांची ग्वाही

परभणी : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होण्यासाठी जिंतूर उमेदवार मेघना साकोरे-बोर्डीकर यांना विजयी करा. जिंतूर, सेलू मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करू, अशी ग्वाही आमदार पंकजा मुंडे यांनी जिंतूर येथे शनिवारी (१७ नोव्हेंबर) आयोजित सभेत दिली.

व्यासपीठावर आमदार बोर्डीकर, प्रताप देशमुख, डॉ.पंडित दराडे, गोविंद थिटे आदींसह मान्यवर उपस्थित होते. मुंडे यांनी आपल्या भाषणात महायुती सरकारने लाडकी बहिण, शेतकरी सन्मान सारख्या विविध योजनांचा सर्वसामान्य जनतेला लाभ मिळवून दिल्याचे सांगितले. मेघना बोर्डीकर ह्या माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला येतात. आम्ही दोघी वडिलांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आहोत. जातीपातीच्या भिंती तोडत, मुंडे आणि बोर्डीकर कुटुंब एकत्र येऊन, जिंतूर आणि सेलूच्या जनतेचे भविष्य घडवण्याचे काम करीत आहे. राज्यात महायुतीचा मुख्यमंत्री व्हावा हीच इच्छा आहे. यासाठी एकजूट आणि निष्ठेने महायुतीच्या विजय करा, असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन विकास जाधव यांनी केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!