‘ज्ञानसाधना’चे प्राचार्य डॉ.सलाउद्दीन यांना पेटंट
इन्सुलिन वितरित करण्याच्या पद्धतीवर पेटंट
परभणी : तालुक्यातील धर्मापुरी पाटी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या ज्ञानसाधना कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.डी.सलाउद्दीन यांना इन्सुलिन वितरित करण्याची पद्धत (Method for delivering Insulin) यावर पेटंट मिळाले आहे. असह्य महामारी सारख्या परिस्थितीला आळा घालण्यासाठी आणि औषध वितरण तंत्रज्ञानामध्ये आघाडीवर राहण्यासाठी, हे संशोधन नॅनो तंत्रज्ञानावर आधारित अचूक औषध वितरण तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. संरचित सिलिका/पॉलिमरिक नॅनोकॉम्पोजिट्स सारख्या बायोकॉम्पॅटीबल डिलिव्हरी स्रोतांचा वापर करून औषध वितरण प्रणाली इन्सुलिन वाहून नेण्यासाठी आशादायक नॅनो वाहने म्हणून ओळखली जाते. या यशाबद्दल प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के व सचिव शितल सोनटक्के, डी.व्ही.सूर्यवंशी, एन.व्ही.क्षीरसागर, ए.ए.नजन, पी.एन.काळे, प्राध्यापक कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.