सेलूतील हायप्रोफाइल जुगार अड्ड्यावर छापा

४४ जुगारी ताब्यात, २५ लाखांचा मुद्देमाल जप्त, पोलिसांची कारवाई.

परभणी : सेलू (जि.परभणी) येथील एका सेवाभावी संस्थेच्या इमारतीत सुरू असलेल्या अवैध हायप्रोफाइल जुगार अड्ड्यावर छापा घालून, पोलिसांनी रोख ३ लाख ४२ हजार रुपयांसह एकूण २५ लाख ६५ हजार ५२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत ४४ जुगार्‍यांना ताब्यात घेतले आहे.
सोमवारी (९ मे) रात्री सव्वा सातच्या सुमारास सहायक पोलीस अधीक्षक अश्वीनकुमार यांच्या नेतृत्वात पोलिसांनी ही कारवाई केली.
या बाबत माहिती अशी, की सेलू (जि.परभणी) येथील पाथरी रस्त्यावरील श्रीकृष्ण नगरमध्ये, विनोद पवार यांच्या वा.सु.साई सेवाभावी संस्थेच्या इमारतीत अनाधिकृत जुगार अड्डा चालतो अशी माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला, तेव्हा तिथे तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यावरून ४४ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपींकडून रोख तीन लाख ४२ हजार, ५ चारचाकी, १२ दुचाकी असा एकूण २५ लाख, ६५ हजार ५२८ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपास सहायक पोलिस अधिक्षक अविनाश कुमार, यांच्या मार्गदर्शात पोलिस निरिक्षक रावसाहेब गाडेवाड, सहायक पोलिस निरिक्षक अंधारे करीत आहेत. आरोपींची नावे अशी : विष्णू गणपत वाघ, विनोद माणिकराव राजूरकर, महालिंग गणूआप्पा कवळे, कलिमखान लालाखान पठाण, संदीप अर्जुनराव अक्सर, ज्ञानेश्वर लिंबाजी बोंबले, भागवत वामनराव लहाने, रामभाऊ किशनराव धापसे, धनंजय कन्हैयालाल गोंड, विक्की रमेश शर्मा, दीपक सखाराम कोल्हाल, रवि लक्ष्मण अंभुरे, शेख मुश्ताक शेख अब्दुल रज्जाक, विनोद रामचंद्र पवार, सुनिल मुरलीधर पवार, (सर्व रा.सेलू), बालाजी अंजिराम झांजे रा.शिराळा, गणेश बाबूराव लहाने (रा.आहेर बोरगाव), प्रवीण प्रतापराव आवटे रा.म्हाळसापूर,अनंता माणिक रोडगे रा.रवळगाव, रफिक शफिक खान रा.लोणार, सय्यद फिरोज सय्यद लियाकत (रा.परभणी), पठाण रशीद कादर,(रा.इस्लामपूर), एजाजखान नाशीरखान (रा.पाथरी), विजय राजेभाऊ जाधव (पाचेगाव), सिद्दिक जाकेर जरियावाला (रा.किनवट), सोहेल अहमद सिद्दीकी रा.बीड, इम्रान खान मोसिन खान (रा. लोणार), सुनील जयराम सूचान, गणेश शंकर राठोड (रा.कोतमवाडी) पवन मदनलाल शर्मा, रामनिवास नंदलाल काबरा, रमेश बळीराम आबूज (रा.वरखेड), संतोष गोविंदराव महिवाल (रा.परतूर) जमिर खान खदिरखान (रा.परभणी), रमेश जिवन साबळे (रा.जालना), प्रकाश आप्पासाहेब कावळे रा.केदारवाकडी, शेख शाहरूख शेख बाबू, इरफान पठाण (रा.सातोना), कल्याण सुंदरराव खरात, परमेश्वर आश्रोबा शेरे, रा.लिंबेवडगाव, ज्ञानेश्वर रामभाऊ जगताप (रा.पुणे), जगन्नाथ काकडे, भिकाजी खराबे, राधेश्याम साबू (रा. मंठा).

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!