म्हाळसापूर : किशनराव रामभाऊ सोळंके ( वय ७८, रा.म्हाळसापूर ता.सेलू जि.परभणी) यांचे सोमवारी (९ मे) सायंकाळी साडेपाच वाजता निधन झाले. मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर म्हाळसापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, सुना ,नातवंडे असा परिवार आहे. बादशहा मसाले कंपनीतील विक्री अधिकारी शिवाजी सोळंके यांचे ते वडील होत.