विधानसभा निवडणूक : महायुतीची बंपर बहुमताकडे वाटचाल, सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा

विधानसभा निवडणूक : महायुतीची बंपर बहुमताकडे वाटचाल, सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीचे सुरुवातीचे कल येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान झाले असून आजचा निर्णायक दिवस अखेरीस आला आहे. मतमोजणीला सुरूवात झाली असून पहिल कला हाती आला आहे ज्यामध्ये भाजपच्या नेतृत्वातील महायुतीला मोठे बहुमत मिळत असल्याचे चित्र दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपला आतापर्यत २१८ जागा मिळत असल्याचे दिसत आहे तर महाविकास आघाडीला केवळ ५८ जागा मिळत आहेत.

एक्झिट पोल्स ठरले खोटे

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी सर्वच एक्झिट पोल्सना चुकीचं ठरवलं आहे. तब्बल पाच वर्षाच्या राजकीय गोंधळानंतर विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचा एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या साथीने राज्यात महायुती सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. कोणत्याही एक्झिट पोलने युती सरकारने एवढी मोठी आघाडी मिळण्याची शक्यता वर्तवली नव्हती पण मतदारांनी विद्यमान सरकारवर विश्वास दाखवला आणि पुन्हा निवडून आणले. निवडणुकीसाठी मतदान पूर्ण झाल्यावर जाहीर झालेल्या एक्झिट पोल्समध्ये भाजप-शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या महायुतीला जास्तीत जास्त १९० जागांचा अंदाज बांधण्यात आला होता पण विद्यमान सरकारने एक्झिट पोल्सना खोटं ठरवलं आणि मोठ्या फरकारने पुन्हा एकदा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा करत महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!