प्रॉस्परस पब्लिक स्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात
सेलू/परभणी : सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान संचालित प्रॉस्परस पब्लिक स्कूलमध्ये मंगळवारी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, प्राचार्या प्रा.प्रगती क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून संविधानाचे महत्व विशद केले.