सुशिक्षित बेरोजगारांना काम वाटपाची सुवर्ण संधी
परभणी : जिल्ह्यातील सुशिक्षित बेराजगार सेवा सहकारी संस्थांना शासन निर्णयानुसार तीन लाख रुपयांपर्यंतची कामे देण्यात येत होती. सदर शासन निर्णयामध्ये वित्तीय मर्यादेत सुधारणा करून कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाने शासन निर्णय दि.28 ऑगस्ट 2024 अन्वये कामाची रक्कम 10 लाख रुपयांपर्यंत केली आहे. भविष्यात जिल्ह्यातील विविध शासकीय/ निमशासकीय विभागाकडून 10 लक्षापर्यंतची कामे जिल्हा कौशल्य विकास विभागाकडे प्राप्त होतील. त्यामुळे जिल्ह्यातील कार्यरत सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थांनी लेखापरीक्षण अहवाल 2023-24, संस्थेतील सर्व सभासदांचे चालू नाव नोंदणी प्रमाणपत्र, सन 2024-25 या आर्थिक वर्षांत संस्थेची काम करण्याची तयारी असल्यास संस्थेचे इच्छापत्र, मागील वर्षाचे वार्षिक सर्वसाधारण सभेचे सर्व कागदपत्रे इ. बाबी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी शासकीय तंत्र प्रशाला केंद्र, नारायण चाळ, स्टेडीअम जवळ परभणी येथे 5 डिसेंबर 2024 रोजीपर्यंत दाखल कराव्यात, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.