‘बाप नावाची माय’ पुरस्काराने रामराव वाघ सन्मानित
सुंदरलाल सावजी बँक व स्व.विश्वनाथराव गायकवाड चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम
जिंतूर : सुंदरलाल सावजी बँक जिंतूर व साहित्यिक डॉ.राजेश गायकवाड यांचे वडील स्व.विश्वनाथराव विठ्ठलराव गायकवाड चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ‘बाप नावाची माय’ पुरस्कार रामराव गोविंदराव वाघ (पांगरी,ता.जिंतूर) यांना २७ नोव्हेंबररोजी प्रदान करण्यात आला.
जुनी मुन्सफी येथे आयोजित सावजी व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात हा सन्मान सोहळा पार पडला. या वेळी ‘डॉक्टर फॉर बेगर्स’ म्हणून ओळखले जाणारे पुण्याचे डॉ.अभिजित सोनवणे, प्राचार्या डॉ.संध्याताई दुधगावकर, सावजी बँकेचे चेअरमन मुकुंद सावजी कळमकर तसेच डॉ. राजेश विश्वनाथ गायकवाड उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ.राजेश गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन देवानंद सावंत, तर आभार प्रदर्शन सावजी बँक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.निलेश कळमकर यांनी केले.