CM : …हा नेता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार !

CM : …हा नेता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार !

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत आझाद मैदानावर शपथग्रहण सोहळा

मुंबई : विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवणाऱ्या महायुतीला अद्याप सत्ता स्थापन करता आलेली नाही. यानंतर आता भारतीय जनता पक्षाच्या गटातून मोठी बातमी आहे. भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने याबद्दलची माहिती दिल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक २ किंवा ३ डिसेंबरला होणार असल्याची माहिती या नेत्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर वृत्तसंस्थेला दिली.

महायुती २.० सरकारचा शपथविधी ५ डिसेंबरला आझाद मैदानावर होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर राहतील. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होतील. २०१४ ते २०१९ या कालावधीत त्यांनी मुख्यमंत्रिपद भूषवले. मुख्यमंत्रिपदाचा ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते राज्यातील दुसरेच नेते ठरले. २०१९ मध्ये शिवसेनेने भाजपची साथ सोडल्यानंतर फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांसोबत राजभवनात सकाळी उरकलेला शपथविधी चांगलाच गाजला. मात्र हे सरकार केवळ साडे तीन दिवस टिकले. त्यानंतर आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.


Credit : MaTa Online

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!