शेख शमशोद्दीन यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार

शेख शमशोद्दीन यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार

मुस्लिम एज्युकेशन ॲन्ड वेलफेअर सोसायटीच्या वतीने आयोजन

सेलू : भारतीय आयुर्विमा महामंडळातीर कर्मचारी शेख शमशोद्दीन हे नियत वयोमानानुसार उच्च श्रेणी सहायक या पदावरून ३४ वर्ष ८ महिने सेवा करून निवृत्त झाले आहेत. विमा कामगार संघटना नांदेडचे ते विभागीय अध्यक्ष आहेत. भारतीय आयुर्विमा महामंडळातील सेवेबद्दल त्यांचा शनिवारी, ३० नोव्हेंबर रोजी सत्कार करण्यात आला‌. गुलमोहर कॉलनी येथे मुस्लिम एज्युकेशन ॲन्ड वेलफेअर सोसायटीच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी शेख शमशोद्दीन म्हणाले की, सर्वांच्या सहकार्याने मी सेवा यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. माणसाने आपल्या जीवनात सतत चांगले कर्म करावे. या वेळी मो.फरहांन अनिस कुरेशी याचा वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएससाठी पात्र ठरल्याबद्दल सत्कार करण्यात आला. मुस्लिम एज्युकेशन ॲन्ड वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष विद्युतअभियंता अनिस कुरेशी, उपाध्यक्ष शेख महेमूद सचिव हाजी शफिख आली खान, कोषाध्यक्ष निसार पठाण, हारून सर, शेख मौजम,जावेद घौरी, हाजी रफिख,जकी सिद्दीकी,‌पठाण रशीद खान इजींनिअर, इमामोद्दीन, शेख असगर, इम्रान कुरेशी, हाजी युनूस कुरेशी यांची उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!