परभणी जिल्ह्यातील २०० एकल पालक व अनाथ मुलींना स्वेटर्स वाटप

परभणी जिल्ह्यातील २०० एकल पालक व अनाथ मुलींना स्वेटर्स वाटप

एचएआरसी संस्थेचा उपक्रम, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात कार्यक्रम

सेलू/परभणी : मागील आठवड्यापासून कडाक्याची थंडी वाढली आहे. या वाढत्या थंडीत जिल्ह्यातील सात तालुक्यातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या निवासी वसतिगृहात शिकणाऱ्या वडिलांचे छत्र हरवलेल्या २०० एकल पालक व अनाथ मुलींना थंडी पासून बचावासाठी होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्थेतर्फे स्वेटर्स वाटप करणार आहे.
रविवारी, एक डिसेंबर रोजी एचएआरसी संस्थेच्या टीमने सेलू येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय वसतिगृहातील २८ गरजू मुलींना स्वेटर्स वाटप केले. “सध्या परभणी जिल्ह्यातील तापमान ९ अंशापर्यंत खाली आले असून अशा कडाक्याच्या थंडीत शासनाच्या केजीव्हीबी वसतिगृहात शिकणाऱ्या या एकल पालक व अनाथ मुलींचे थंडी पासून बचाव व्हावे म्हणून एचएआरसी संस्थेतर्फे लोकसहभागातून ‘प्रकाशवाटा’ या व्हाट्सएपच्या ग्रुपवर आवाहन करून यातून जमा देणगीतून या गरजू मुलींना स्वेटर्स देता येणार आहे याचे समाधान आहे” असे एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक म्हणाले.
या प्रसंगी इंजिनीअर रवी मंत्री, चंद्रकांत राजुरे, राजेंद्र खापरे, गृहप्रमुख मीना मावरे, प्रेरणा पवार, कलाशिक्षक पांडुरंग पाटणकर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्ताविक मीना मावरे यांनी केले. सूत्रसंचालन पाटणकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रेरणा पवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी धोंडीराम गोरे, सावित्रा ढवळे, वर्षा बरसाले यांनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!