सेलूमध्ये पत्रकार, पोलिस कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात 

सेलूमध्ये पत्रकार, पोलिस कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात 

मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम 

सेलू : अखिल भारतीय मराठी परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त सेलूत ३ डिसेंबर रोजी पत्रकार व त्यांच्या कुटूंबीयांची आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात पार पडले. सेलू उपजिल्हा रुग्णालयात हे शिबिर आयेाजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरवात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. अध्यक्षस्थानी डॉ.जनार्धन गोळेगावकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, डॉ.म्हस्के, तालूका पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल, जिल्हा उपाध्यक्ष मोहंमद ईलयास यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. या वेळी ४० पत्रकार व त्यांच्या कुटु़ंबियांची, पोलिस कर्मचारी तसेच दिव्यांग बांधवांची तपासणी करण्यात आली. या शिबीरात शुगर, बीपी, इसीजी या बरोबरच सीबीसी, एचबीएवनसी, लिपीड प्रोफाईल, थायराईड प्रोफाईल, किडनी फंक्शन, लिव्हर फंक्शन एचपीएलसी आदींसह विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. सूत्रसंचालन निसार पठाण यांनी केले. मोहसीन अहेमद यांनी आभार मानले. शिबिरासाठी उपजिल्हारुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!