श्रीक्षेत्र मल्हारगडावर खंडोबा यात्रा महोत्सवाला सुरुवात

श्रीक्षेत्र मल्हारगडावर खंडोबा यात्रा महोत्सवाला सुरुवात

श्री शिवपुराण कथा, कीर्तन, भजनासह विविध धार्मिक कार्यक्रम

सेलू/परभणी : चंपाषष्ठीनिमित्त देवगावफाटा (ता.सेलू) येथील श्रीक्षेत्र मल्हारगडावर खंडोबा यात्रा महोत्सवाला सोमवारपासून (२ डिसेंबर) उत्साहात सुरुवात झाली आहे. नऊ डिसेंबरपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह, शिवमहापुराण कथा आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज काकडा आरती, भजन, प्रार्थना, पसायदान, श्री ज्ञानेश्वरी पारायण व दुपारी बारा ते चार या वेळेत मनमोहनजी महाराज गिरी यांच्या वाणीतून संगीतमय वातावरणात शिवपुराण कथा श्रवण करण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. सायंकाळी हरिपाठ व दररोज रात्री आठ ते दहा हरिकीर्तनाचे होत आहे. नऊ डिसेंबरला सकाळी दहा वाजता श्रीगुरू पुंडलिक महाराज मोरे देहूकर यांचे काल्याचे कीर्तन होईल व त्यानंतर बाणदार खेळणे कार्यक्रम होईल. श्रींची महाआरती झाल्यानंतर महाप्रसाद होईल. कार्यक्रमामध्ये भाविकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन खंडोबा मंदिर देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, श्रीक्षेत्र मल्हारगडावरील खंडोबा मंदिरात चंपाषष्ठीनिमित्त दरवर्षी हजारो भाविकांची मोठी गर्दी होते. यावर्षी खंडोबा मंदिराला ‘क’ वर्ग दर्जा घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे मंदिर संवर्धनाचे काम गतीने पुढे जाणार आहे, या बद्दल भाविकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!