बोर्डीकरांनी घेतली अजित पवार यांची भेट
परभणी : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर तसेच सेलू जिंतूरच्या नवनिर्वाचित आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सोमवारी, २ डिसेंबर रोजी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. राज्यात महायुतीने मिळविलेल्या अभूतपूर्व यशाबद्दल पवार यांचा यथोचित सत्कार केला. विधानसभा सदस्यपदी निवड झाल्याबद्दल पवार यांनी मेघना साकोरे यांचे अभिनंदन केले. यावेळी प्रभाकर वाघीकर, दिनकर वाघ, पप्पू डोंबे, बाळासाहेब मते आदींची उपस्थिती होती.