मांडाखळीची इंद्रायणी प्राथमिक शाळा सर्वात ‘सुंदर’
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा- २ : ज्ञानसाधना प्रतिष्ठानतर्फे शिक्षकांचा गौरव
परभणी : राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा- २’ या शैक्षणिक उपक्रमात मांडाखळी येथील इंद्रायणी प्राथमिक शाळेने परभणी तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावित, राज्यसरकारचे तीन लाख रुपयाचे रोख पारितोषिक मिळवले आहे. या बद्दल सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
मागील वर्षी शाळेला तृतीय क्रमांक मिळाला होता. शाळेमध्ये शिक्षकांनी राबविलेल्या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थी हिरीरीने सहभागी होतात. मागील वर्षी शाळेने तृतीय क्रमांक मिळविला होता. या वर्षी सर्वप्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल ज्ञानसाधना प्रतिष्ठानतर्फे संस्थाध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के, सचिव प्रा.शितल सोनटक्के यांच्याहस्ते शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी समन्वयक रूखमांगत चाफे, मुख्याध्यापिका सुरेखा रोडे, मुख्याध्यापक विलास पवार, प्राचार्य सचिन कऱ्हाळे, विभाग प्रमुख विठ्ठल खाडे, त्र्यंबक डाढाळे, नवनाथ सोनटक्के आदींची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी श्री.चाफे, प्रा.शीतल सोनटक्के यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. अध्यक्षीय भाषणात शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत, शाळेने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवावा यासाठी प्रा.किरण सोनटक्के शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक सुरेख रोडे, सूत्रसंचालन पुष्पा कदम यांनी केले. त्र्यंबक डाढाळे यांनी आभार मानले.