दलितमित्र श्रीरामजी भांगडिया जयंती : रंगभरण चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
सेलूतील नूतन विद्यालयाचा उपक्रम, सहाशेपेक्षाजास्त विद्यार्थ्यांचा सहभाग
सेलू/परभणी : दलितमित्र श्रीरामजी भांगडिया यांच्या जयंतीनिमित्त (चंपाषष्ठी ) सेलू येथील नूतन विद्यालयातील चित्रकला विभागाच्या वतीने मागील १७ वर्षांपासून चित्रकला व रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी इयत्ता पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी या तीन गटातील ६०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी प्राण्यांची चित्रात, तर पाचवी ते सातवी विद्यार्थ्यांनी ‘पतंग उडवणारे विद्यार्थी’ या चित्रात आपल्याने कल्पकतेने रंगभरले.आठवी ते दहावी विद्यार्थ्यांनी ‘ मी आणि माझी सुंदर शाळा, माझा आवडता खेळ, भारतीय सैनिक एक प्रसंग ‘ या विषयावर आपल्या कल्पनेने चित्रे साकारली.
या वेळी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, चिटणीस डॉ.विनायकराव कोठेकर, सहचिटणीस उद्योजक जयप्रकाशजी बिहाणी, कार्यकारिणी सदस्य प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, नंदकिशोरजी बाहेती, प्राचार्य डॉ.उत्तम राठोड, मुख्याध्यापक संतोष पाटील, सुखानंद बेंडसुरे, प्राचार्य नरेंद्र पाटील, मुख्याध्यापिका निशा पाटील, उपमुख्याध्यापक परसराम कपाटे, के.के.देशपांडे, पर्यवेक्षक रोहिदास मोगल यांनी स्पर्धेस भेट देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. सूत्रसंचालन डॉ.सुरेश हिवाळे यांनी केले.
स्पर्धा यशस्वीतेसाठी संयोजक आर.डी.कटारे, फुलसिंग गावित, बाबासाहेब हेलसकर, भगवान देवकते, बाळू बुधवंत, सुनील तोडकर, कीर्ती राऊत, अश्विनी पटाईत, आदिती आंबेकर, प्रतिज्ञा चव्हाण, संध्या फुलपगार, बाबासाहेब गोरे, प्रणिता सोलापूरे, बेदरकर, पदमावत, व्यास, दळवी, चिटणीस, कुंभार, बिरादार, भांबळे, अनिल रत्नपारखी, खाटीकमारे, पांडुरंग पाटणकर, विजेंद्र धापसे, केशव डहाळे, अरुण रामपूरकर, गोरखनाथ घायाळ, रामेश्वर पवार आदींनी सहकार्य केले.