एआरटीएम शाळेच्या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन

एआरटीएम शाळेच्या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन

सेनगाव  : येथील एआरटीएम इंग्लिश स्कूलमध्ये क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन थाटात पार पडले. अध्यक्षस्थानी हिंगोली जिल्हा अथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष रमेश गंगावने, प्रमुख पाहुणे म्हणून सेनगाव तालुका क्रीडा संयोजक सोपान नाईक, स्वाती गणगे, गजानन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष  ब्रिजगोपाल तोष्णीवाल, संचालक पंकज तोष्णीवाल, तर उद्घाटक पोलीस निरीक्षक ज्योती मुंढे यांची उपस्थिती होती खेळातून विद्यार्थी घडतात व त्यांचा सर्वांगीण विकास होत असतो असे प्रतिपादन  मुंढे यांनी या वेळी केले.

तीन दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकाराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रास्ताविक प्राचार्य आर. व्ही. सुनिलकुमार यांनी केले.  संचलन सूत्रसंचालन कविता गिराम, देविदास पुरी व आभार क्रिडा विभाग प्रमुख संतोष शिंदे यांनी मानले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत. या वेळी चिमुकल्यांनी सादर केलेल्या समूह नृत्याने उपस्थिताचि मने जिंकली.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!