दलितमित्र श्रीरामजी भांगडिया यांना अभिवादन

दलितमित्र श्रीरामजी भांगडिया यांना अभिवादन

सेलूतील नूतन विद्यालयात कार्यक्रम, गांजापूरकर परिवारातर्फे संस्थेस एक लाखांची देणगी

श्रीरामजी भांगडिया जयंतीचे औचित्यसाधून माजी विद्यार्थी सचिन गांजापूरकर आणि शिक्षक भालचंद्र गांजापूरकर परिवारातर्फे सरोज कांतराव जोशी-गांजापूरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक लाख एक हजार रूपयाचा देणगी धनादेश संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आला. यानिमित्त गांजापूरकर यांचे संस्थेतर्फे स्वागत करण्यात आले.

सेलू/परभणी : सेलू शहराचे शिल्पकार, दलितमित्र श्रीरामजी भांगडिया यांना जयंतीनिमित्त शनिवारी ( ७ डिसेंबर) अभिवादन करण्यात आले. नूतन विद्यालयात सकाळी नऊ वाजता हा कार्यक्रम झाला. या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, चिटणीस प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सहचिटणीस जयप्रकाशजी बिहाणी, कार्यकारिणी सदस्य नंदकिशोरजी बाहेती, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, प्राचार्य डॉ.उत्तम राठोड, मुख्याध्यापक संतोष पाटील, सुखानंद बेंडसुरे, प्राचार्य नरेंद्र पाटील, मुख्याध्यापिका निशा पाटील, उपमुख्याध्यापक परसराम कपाटे, के.के.देशपांडे, दत्तात्रय घोगरे, रोहिदास मोगल संस्थेच्या विविध घटक संस्थातील शिक्षक, कर्मचारी यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन सुरेश हिवाळे यांनी केले. प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांनी आभार मानले.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!