दादूपंथी मठाच्या जागेवर पर्यटन केंद्र उभारणार

दादूपंथी मठाच्या जागेवर पर्यटन केंद्र उभारणार

सेलूतील कार्यक्रमात आमदार मेघना बोर्डीकर यांची ग्वाही

सेलू/ परभणी : जिल्ह्यातील सेलू येथील श्री संत गोविंदबाबा दादुपंथी मठ गोशाळेच्या विकासासाठी विशेष प्रयत्नांद्वारे पुढाकार घेऊन, गोशाळेच्या ३२ एक्कर जागेवर भव्य पर्यटन केंद्र उभारणार असल्याची ग्वाही सेलू-जिंतूरच्या आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी बुधवारी, ११ डिसेंबर रोजी दिली.

गोसेवा आयोगाच्या वतीने मंजूर करण्यात आलेल्या गोशाळेच्या टिनशेड उभारणीच्या कामाचे भूमिपूजन आमदार बोर्डीकर यांच्या हस्ते झाले. पंतप्रधान‌ नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिना निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही आमदार बोर्डीकर यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड.दत्तराव कदम, डॉ.संजय रोडगे, दिनकर वाघ, गोशाळा संचालक सुरेंद्र तोष्णीवाल, जगन्नाथ पवार, अविनाश बिहाणी, सूर्यकांत जाधव, शिवनारायण मालाणी, मनोहरगुरू रत्नपारखी तसेच रूपाली ठाकूर, कपील फुलारी, अजय डासाळकर आदींची प्रमुख उपस्थिती. या वेळी आमदार बोर्डीकर यांच्या हस्ते गोमातेचे पूजन करण्यात आले. विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा विजय मिळवल्याबद्दल गोशाळेच्या वतीने आमदार बोर्डीकर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन शिवनारायण मालाणी यांनी केले.‌ आनंद सोनी, कृष्णा काटे, ॲड.कृष्णा शेरे, अनुप गुप्ता, अशोक शेलार, बबलू दायमा, पापा काबरा, गोविंद शेलार, विजय पांडे आदींची उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!