सेलूतील नूतन कन्या प्रशालेच्या माजी विद्यार्थिनींचा मेळावा

सेलूतील नूतन कन्या प्रशालेच्या माजी विद्यार्थिनींचा मेळावा

सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त उपक्रम, विविध कार्यक्रम, सहभागी होण्याचे आवाहन

सेलू/परभणी : येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशाला व श्रीमती तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल उच्च माध्यमिक विभागाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त २८ आणि २९ डिसेंबर रोजी माजी विद्यार्थिनी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. मुख्याध्यापिका निशा पाटील यांनी ही माहिती कळविली आहे.

१ ऑगस्ट १९७३ रोजी श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेची स्थापना झाली. प्रशालेच्या विद्यार्थिनी विविध सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आदी क्षेत्रात देश-परदेशात नाव उज्ज्वल करत आहेत. शाळेने दिलेल्या ज्ञानाची अखंड शिदोरी कायम ठेवत. गुरु -शिष्य नात्यातील ऋणानुबंध जोपासत आहेत. यानिमित्ताने २८ आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी प्रशालेच्या प्रांगणात माजी विद्यार्थिनी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व क्षेत्रात भरारी घेतलेल्या विद्यार्थिनींनी पुन्हा एकदा प्रशालेच्या प्रांगणात कृतज्ञापूर्वक येण्याची अपेक्षा आहे. माजी विद्यार्थिनींनी शिक्षक शशिकांत देशपांडे ९१३०८८८००२, कैलास मलवडे ९२७०७२१०२५, सतीश कुंडीकर ९७६०३८४१३७, संगीता खराबे ८८०५३११९०९ यांच्याकडे नोंदणी करून मेळाव्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!