ध्रुव साकोरे यांची नूतन विद्यालयास भेट
सेलू : राज्यमंत्रीपदी नियुक्त झालेल्या आमदार मेघना दीपक साकोरे यांचे चिरंजीव ध्रुव साकोरे यांनी नूतन विद्यालय, सेलू येथे सदिच्छा भेट दिली. त्यांनी दीपस्तंभ प्रतिष्ठानतर्फे उभारण्यात आलेल्या अद्ययावत संगणक कक्षाची पाहणी करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, रोहिदास मोगल यांची उपस्थिती होती.
परभणी जिल्ह्यातील शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्याचा संकल्प आहे. शैक्षणिक विकास हेच आपले प्रमुख ध्येय असून, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शासन पातळीवर ठोस पावले उचलली जातील, यासाठी आपण प्रयत्नशील राहू असा विश्वास ध्रुव साकोरे यांनी व्यक्त केला.