परभणी, नागपूर, बुलढाणा संघांची विजयी सलामी

परभणी, नागपूर, बुलढाणा संघांची विजयी सलामी

पहिल्या राज्य लॅक्रॉस क्रीडा स्पर्धेचे सेलूमध्ये शानदार उद्घाटन

सेलू/ परभणी : पहिल्या राज्य लॅक्रॉस सब ज्युनिअर व ज्युनिअर क्रीडा स्पर्धेचे उद्घान शनिवारी, २१ डिसेंबररोजी सेलू येथील नूतन विद्यालयाच्या क्रीडांगणावर झाले. दोन दिवसीय स्पर्धेत राज्यातील २२ संघ सहभागी झाले असून पहिल्याच दिवशीच्या सामन्यात परभणी, नागपूर, बुलढाणा संघांनी विजयी सलामी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य लॅक्रास असोसिएशन, परभणी जिल्हा असोसिएशन व नूतन विद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.व्ही.के. कोठेकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया होते.या वेळी महाराष्ट्र लॅक्रॉस असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.सुमेधा ठाकुर, सचिव डॉ.मोहम्मद बाबर,संतोष पाटील  किरण देशपांडे, जिल्हा कार्याध्यक्ष कैलास माने, ज्ञानेश्वर गिरी, गणेश माळवे, जिल्हा सचिव प्रशांत नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ बाबर म्हणाले की,  लॅक्रॉस खेळ फार पूर्वीपासून खेळ खेळला जातो, महाराष्ट्र राज्यात प्रथमच सेलू येथे राज्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. लॅक्रॉस खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जातो. २०२८ च्या  ऑलिंपिक स्पर्धेसाठी खेळाचा समावेश करण्यात आला आहे. भविष्यात सेलू शहरातील खेळाडू ऑलिंपिक स्पर्धेत या खेळाचे प्रतिनिधीत्तव करतील, अशी अपेक्षा बाबर यांनी व्यक्त केली.
सूत्रसंचालन गोपाळ आम्ले, तर आभारप्रदर्शन गणेश माळवे यांनी केले.

पहिला सामना परभणी वि.नाशिक दरम्यान परभणी संघाने २ गोल ने विजयी ठरला. दुसरा सामना बुलढाणा वि सोलापूर दरम्यान बुलढाणा १ गोलने विजयी ठरला.‌ तिसरा सामना अतितटी सामन्यात अमरावती वि नागपूर दरम्यान बरोबरीत सुटला. विजेता संघातील खेळाडूंना सामनावीर पुरस्कारात हेडफोन व स्मार्ट वॉच राज्य संघटनेच्या वतीने देण्यात येत आहे. स्पर्धा यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष संतोष कंठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवकुमार कोळे, श्रीराम निळे, विशाल पवार, सुमित जंजाळ, रामदास गिरी, सिकंदर शेख, राहुल गांगडे, अनुराग अंबटी, कुणाला चव्हाण, सुरज शिंदे, महेश काळदाते, अमोल बिचाले, समाधान मस्के, गणेश सावटे आदी परिश्रम घेत आहेत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!