श्रीराम प्रतिष्ठानच्या सुरभी महोत्सवांतर्गत स्पोर्ट्स डे उद्घाटन

श्रीराम प्रतिष्ठानच्या सुरभी महोत्सवांतर्गत स्पोर्ट्स डे उद्घाटन

सेलू : श्रीराम प्रतिष्ठान सेलूच्या रौप्य महोत्सवी वर्ष २०२४अंतर्गत आयोजित सुरभी महोत्सवातील स्पोर्ट्स डे सोहळ्याचा उद्घाटन कार्यक्रम शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, उद्घाटक पालक रवी डासाळकर होते. या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती निशा चंदेल, अनंत तेलभरे, नामदेव चव्हाळ, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे व सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनीही या सोहळ्यात सहभाग नोंदवला.

स्पोर्ट्स डे अंतर्गत एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल, प्रॉस्परस पब्लिक स्कूल, उत्कर्ष विद्यालय, आणि ज्ञानतीर्थ विद्यालय या घटक संस्थांमधील विद्यार्थ्यांनी आंतरशालेय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली. कबड्डी, क्रिकेट, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल आणि खो-खो या क्रीडाप्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी आपली क्षमता सिद्ध केली.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!