माथला क्रिकेट लीगचे उद्घाटन
परभणी : राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांची राज्य मंत्रिमंडळात निवड झाल्याच्या निमित्ताने “माथला प्रीमियर लीग”भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या क्रिकेट सामन्याचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष मुन्ना गोरे आणि भाजप तालुकाध्यक्ष गोविंद थिटे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आयोजक सुनील भोंबे, कैलास खंदारे, सुनील मते, रवी रानबावळे, भास्कर थिटे, रमेश सडाळ, रामप्रसाद कांठळे, अर्जुन जाधव, अमोल देशमुख, अनिल आप्पा कवठेकर, सरपंच ज्ञानेश्वर राऊत, अजित भोंबे, नामदेव भोंबे, प्रकाश भोंबे, अर्जुन भोंबे, योगेश भोंबे, शाम भोंबे, लखन भोंबे, कृष्णा भोंबे, शरद भोंबे, शंकर भोंबे, मुन्ना भोंबे, शुभम मस्के यांच्यासह स्पर्धेतील सर्व टीम उपस्थित होत्या.