राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर परभणी दौऱ्यावर

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर परभणी दौऱ्यावर

परभणी : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण ,ऊर्जा , सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम),पाणीपुरवठा व स्वच्छता, महिला व बाल कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर आज २३ डिसेंबर रोजी अहिल्यानगर, बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर जिल्हा दौऱ्यावर आहेत.

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा दौरा : शासकीय वाहनाने ९.०० वाजता सागरीका बंगला पुणे येथून शेगुड ता.कर्जत जि.अहिल्यानगरकडे प्रस्थान शासकीय मोटारीने प्रयाण, १२ः००  वाजता शेगुड ता.कर्जत जि.अहिल्यानगर येथे श्री खंडोबा मंदीर येथे आगमन व दर्शन, मोटारीने प्रयाण १२ः३० वाजता शेगुड ता.कर्जत जि.अहिल्यानगर येथून मस्साजोग ता.केज कडे प्रस्थान, ४ः०० वाजता स्व संतोष देशमुख यांचे निवासस्थान मस्साजोग ता.केज जि.बीड येथे आगमन ४ः०० वाजता स्व.संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट, ४ः३०-मस्साजोग ता.केज जि .बीड येथून परभणीकडे प्रयाण ६ः१५-परभणी येथे आगमन, ६ः१५-स्व.विजय वाकोडयांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट, ६ः३०-स्व.सोमनाथ सुर्यवंशी यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट,

६ः४५-परभणी वरून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण, १०ः०० वाजता छत्रपती संभाजीनगर येथे आगमन व मुक्काम वी.टी.पाटील प्लॉट नंबर १, सी ३ टाऊन सेंटर, सिडको, आयनॉक्समागे तापडिया सिनेमार्केट, छत्रपती संभाजीनगर. सोबती संपर्क : अजित पवार ७२१८४८६४६२, सोबत वाहन क्रमांक एम एच १३ डब्लू ६७८९. राज्यमंत्री महोदया संवेदनशील विषय संबंधी भेटीगाठी घेणार असल्याने सुरक्षा संबंधी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. अशा सूचना सर्व संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!