राहुल गांधींसमोर सोमनाथची आई भावूक

राहुल गांधींसमोर सोमनाथची आई भावूक

मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा देण्याची केली मागणी

परभणी : लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी, २३ डिसेंबररोजी दुपारी परभणी शहरात दाखल झाले. त्यानंतर अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांनी थेट मोंढा भागातील अण्णाभाऊ साठे नगरात जाऊन स्व.सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांंत्वन केले. या वेळी सोमनाथच्या आईने टाहो फोडत अत्यंत भावूक झाल्या. माझ्या मुलाच्या मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी खासदार राहुल गांधी यांच्याकडे केली. परभणी शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली. त्यानंतर शहर व जिल्ह्यात मोठ्या आंदोलन झाले. या आंदोलनानंतर पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले. त्यामध्ये मृत सोमनाथ सूर्यवंशी हा देखील होता. सोमनाथला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याचा त्यामध्ये मृत्यू झाला. सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांचे सांत्वनपर भेट घेण्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे परभणी शहरात दाखल झाले. त्यानंतर दुपारी अडीच वाजता त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या आई व भावाची भेट घेत सांत्वन केले. यावेळी महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथल्ला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, खासदार प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, आमदार प्रज्ञा सातव, खासदार संजय जाधव,  नितीन राऊत, अमित देशमुख आदी उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!