श्रीराम प्रतिष्ठानतर्फे सुरभि महोत्सवाचे आयोजन
सेलू : येथील श्रीराम प्रतिष्ठान आयोजित रौप्य महोत्सवी सुरभि महोत्सवाचे आयोजन २४ ते २९ डिसेंबर दरम्यान सँनरो नॉलेज सिटी (विद्याविहार शैक्षणिक संकुल) येथे करण्यात आले आहे. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत.
सुरभि महोत्सावाच्या स्पोर्ट्स डे २४ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वा या दिनी घटक संस्थेतील सर्व शाळाच्या विद्यार्थ्यांचे पथ संचलन, लेझीम. अरेबिक्स, मनोरे आदी विविध क्रीडा प्रकारचे सादरीकरण करतात. २५ डिसेंबररोजी सकाळी १०.०० वा एकात्मिक आदिवासी प्रकल्प तसेच सायं ६ वा क्युरिअस कीड्स, फिनकीडस, ज्ञिज्ञासा बालविहार व ज्ञानतीर्थ बालवाडीचा सांस्कृतिक कार्यक्रम,
२६ डिसेंबर महाराष्ट्राची लोकधारा व सायंकाळी ५ वाजता पॉस्परस पब्लिक स्कूलचा “ Festivals of India” सांस्कृतिक कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले आहे. प्रिन्स इंग्लिश स्कूलचा सांस्कृतिक कार्यक्रम “ Vibrant India” यावर आधारीत कार्यक्रमाचे २७ डिसेंबररोडी सायं.०५ वा आयोजन करण्यात आले आहे. २८ डिसेंबर रोजी सकाळी १० वा राज्यस्तरीय समुह नृत्य स्पर्धा तसेच सायं ५ वा उत्कर्ष विद्यालय व ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयाचा सांस्कृतिक कार्यक्रम “ संस्कृती महाराष्ट्राची” तसेच रामायण महानाट्य या नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले आहे. रोप्य महोत्सव वर्षानंतर माजी विद्यार्थी मेळावा ” २९ डिसेेंबररोजी सकाळी १० वा आयोजन करण्यात आले आहे.
अपूर्वा पॉलीटेक्निक, आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, डी.एड, बीएड सांस्कृतिक कार्यक्रम व २९ डिसेंबररोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. तसेच आनंद मेळावा २६ ते २९ डिसेबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या सुरभि महोत्सवप्रसंगी सेलू शहरातील सर्व नागरिकांनी , शालेय पालकांनी वरील कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष तथा सुरभि महोत्सवाचे आयोजक डॉ. संजय रोडगे यांनी केले आहे.