प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये ‘महाराष्ट्राची लोकधारा’ कार्यक्रम उत्साहात

प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये ‘महाराष्ट्राची लोकधारा’ कार्यक्रम उत्साहात

सेलू/परभणी : सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान संचालित एल.के.आर.रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील विद्यार्थ्यांनी सुरभी महोत्सवात ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या संकल्पनेवर आधारित वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, सचिव डॉ.सविता रोडगे, प्रमुख पाहुणे डॉ.राजाराम झोडगे, संजय मुंडे, मोहंमद इलियास, बद्री ताठे, बद्री बरसाले, नागेश गायकवाड, रामप्रसाद माघाडे, प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन कल्पना भाबट आणि योगिता यांनी केले. प्रास्ताविक सुमेध जाधव यांनी केले. श्रीकृष्ण खरात यांनी आभार प्रदर्शन केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!