‘आयुष्याची पाठशाळा’ स्नेहसंमेलन उत्साहात
ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, नृत्य कालविष्काराने जिंकली उपस्थितांची मने
परभणी : ज्ञानसाधना प्रतिष्ठान संचालित मांडाखळी येथील इंद्रायणी किड्स किंगडम, इंद्रायणी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, संताई कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आयुष्याची पाठशाळा’ वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. विविध कलाविष्कार सादरीकरणात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित उपस्थितांची मने जिंकली. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के होते. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता प्रल्हाद खुणे, श्रीकांत डोंगरे,अशोक जायभाये, डॉ.संज्योत गिरी, डॉ.गोविंद पावडे, विकास कुकडे, शिक्षणाधिकारी वैभव बाचकर, स्वागताध्यक्षा प्रा.शितल सोनटक्के, सरपंच नागेश शिराळ, शेख मोहसीन, शिवराज सोनटक्के, प्रवीण सोनटक्के आदी मान्यवरांच्या उपस्थिती होती.
स्नेहसंमेलनात आयुष्याची पाठशाळा, मैत्री या थीमवर आधारित विविध कौटुंबिक व सामाजिक स्तरावर वेगवेगळे नातेसंबंध कसे निर्माण होतात व ते कसे निभावल्या जातात हे सहाशेवर विद्यार्थ्यांनी मराठी व हिंदी गीतांवर सुंदर नृत्य आविष्कार सादर करून व्यक्त केले. शिक्षक बळीराम कौसाईतकर, रामेश्वर कच्छवे यांच्या सुरसागर गीत संचाने विविध गीत सादर करून उपस्थितांचे मने जिंकली. या वेळी धनंजय कुलकर्णी मांडाखळीकर यांच्या वेदिका ढोले, रूपाली हराळे, रेश्मा शेख या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात इंद्रायणी प्राथमिक शाळेने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल संस्थेच्या वतीने समन्वयक आर.एस.चाफे, मुख्याध्यापिका.एस.आर.रोडे,एन.डी.सोनटक्के व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.पी.व्ही.कदम, प्रा. एम.टी. देवकते यांनी केले. स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य एस.पी.कराळे, विलास पौळ,व्ही.एल खाडे, एन.डी सोनटक्के, अनुराधा ईजारे, अर्जुन कने व संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.