सेलूतील साईबाबा बँकेतर्फे पुरस्कार प्राप्त गुणवंतांचा सन्मान

परभणी : सेलू ( जि.परभणी) येथील साईबाबा नागरी सहकारी बँकेतर्फे शनिवारी (२१ मे) शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल पुरस्कार प्राप्त गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. या वेळी बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर, संचालक जयप्रकाश बिहाणी, डी.व्ही.मुळे, माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, संभाजी पवार, राजेंद्र आडळकर, ॲड. किशोर.जवळेकर, गंगाधर आडळकर, इम्रान शेख आदींची उपस्थिती होती. डॉ.सतिश लिपणे ( वैद्यकीय सेवा), सुनील हट्टेकर (बँकिंग), डी.डी.सोन्नेकर, नागेश कान्हेकर, सतीश नावाडे, गणेश माळवे ( क्रीडा), डॉ.शिवाजी शिंदे, प्रवीण माणकेश्वर, अनिरुद्ध काटे ( सामाजिक) आदींचा सन्मान करण्यात आला. आपापल्या क्षेत्रात अतुलनीय योगदान देत, राज्य, राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्वांनी, सेलू शहराच्या नावलौकिकात मोठी भर घातली आहे, अशा शब्दांत हेमंतराव आडळकर यांनी कौतुक केले. आजही सेलू शहराचे नाव राष्ट्रीय पातळीवर आहे; तसेच शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातही शहर अग्रेसर आहे. याचा बँकेला अभिमान वाटतो, असे आडळकर यांनी यावेळी नमूद केले. प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाणे, सूत्रसंचालन संतोष हुगे, तर आभार मुळावेकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी योगेश कुलकर्णी, अविनाश, शेख अबुझर, भास्कर आडळकर, सुनील आडळकर गजानन झुटे, उमेश खरावणे आदींनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!