नूतन विद्यालयाच्या स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन

नूतन विद्यालयाच्या स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन

विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांना सुरूवात 

सेलू/परभणी : सेलू येथील नूतन विद्यालयाच्या ‘नवी दिशा नवी आशा’ वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सोमवारी, ३० डिसेंबररोजी उत्साहात पार पडले. यानिमित्ताने ४ जानेवारीपर्यंत विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांचे पथसंचलन झाले. क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली. सामूहिक नृत्य सादरीकरण झाले.

अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संतोष पाटील होते. उद्घाटक म्हणून पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष प्रा.संजय पिंपळगावकर, किरण देशपांडे, सुभदा सुभेदार, माधवी पिंगळे, सुनील गायकवाड, रोहीदास मोगल, गणेश माळवे यांची उपस्थिती होती. प्रा.पिंपळगावकर म्हणाले, ” वार्षिक स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव भेटतो. खेळाडू, कलावंत घडतात.

” कार्यक्रमात विठ्ठल बोरसे, नितेश खिस्ते, आयान शेख, जिवन काजळे, मानसी कुलकर्णी या राष्ट्रीय खेळाडू आणि क्रीडा शिक्षक संजय भूमकर यांचा सत्कार करण्यात आला. सामूहिक नृत्यात शिवानी शिंदे, वैष्णवी पवार, ग्रिष्मा ठाकुर, अक्षरा शिंदे, श्रेया उपाजे, अमृता देशमुख उत्तरा लोंढे, श्रृती गेरकर, अश्विनी जाधव या विद्यार्थीनींनी सहभाग घेतला. त्यांना आदिती अंबेकर, अश्विनी पटाईत यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ.काशिनाथ पल्लेवाड यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.सुरेश हिवाळे यांनी केले. तर आभार प्रशांत नाईक यांनी मानले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!